logo

खोकरविहीर येथे 200 कुटुंबांना रोलर ड्रमचे वाटप

खोकरविहीर l प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ, श्री उद्यम फाउंडेशन, ऋणमुक्त सेवाभावी बहुउद्देशीय संस्था नाशिक, इनरव्हील क्लब ऑफ नाशिक, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे, रोटरी क्लब ऑफ नाशिक, जल परिषद मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने खोकरविहीर ता. सुरगाणा येथे 200 कुटुंबांना जलचक्री व महिलांना चप्पल वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गीता पिंगळे, दिपाली चांडक, माधुरी महाजन, रुपल गुजराती, शितल देसाई, सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय ढगे, चंद्रकिशोर पाटील, संजय परमार ,जलमित्र तथा दिंडोरी नगरसेवक पत्रकार नितीन गांगुर्डे, देविदास कामडी, नारायण गभाले, गवारे साहेब जयराम हाडस, नवल चौरे, किरण जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये गावातील पोलीस पाटील आनंदा जाधव, आंबोडा ग्रामपंचायत सदस्य शांताराम महाले, कृष्णा जाधव साहेब ,मा सरपंच लक्ष्‍मण पाडवी ,शांताराम जाधव, किशोर जाधव, देविदास पाडवी, योगेश जाधव मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिलावर्ग तसेच नाशिक जिल्ह्यातून जलमित्र उपस्थित होते.
गावातील महिलांनी पारंपारिक तूर वाद्याने स्वागत केले तर तुरवाद्यावर गावातील महिला तसेच पाहुण्यांनी ठेका धरला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देविदास कामडी व सूत्रसंचालन दुर्वादास गायकवाड यांनी केले.

0
134 views