वर्धा :पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी.
देवळी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विदर्भप्रमुख तथा युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी दर शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या शेतकरी न्याय दरबारात पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन सुद्धा तक्रारी रिजेक्ट केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी शेतमालाचे भाव कमी असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणे बंद करावी अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. लवकरच तहसीलदारांच्या कक्षामध्ये बैठक आयोजित केली जाईल.