
Aima media जन जन की आवाज
वाटसरूंना अडवून लुटणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, बारामतीत सराईत टोळी जेरबंददीपक पडकर
Aima media जन जन की आवाज
वाटसरूंना अडवून लुटणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, बारामतीत सराईत टोळी जेरबंददीपक पडकर, बारामती : रात्रीच्या वेळी वाटसरूंना अडवून त्यांना मारहाण करून मोबाईल, रोख रक्कम जबरीने चोरून नेणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी, भिगवण रोड, सिटीइन चौक, बारामती क्लब या परिसरात जबरी चोरीच्या घटना सातत्याने घडताना दिसल्या.
Pune News : बारामती तालुका पोलिसांनी रात्रीच्या वेळी वाटसरूंना लुटणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद केले आहे. एमआयडीसी, भिगवण रोड परिसरात जबरी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी अरबाज शेख, अविनाश लोंढे, समाधान खंडागळे आणि रोहित पवार यांना अटक केली आहे. आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या प्रकरणी अरबाज उर्फ बबलू हैदर शेख (वय २४ वर्ष, रा. खंडोबानगर बारामती) अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय १९ वर्ष रा.मळद भोंगळे वस्ती बारामती) समाधान दत्तात्रय खंडागळे वय १९ वर्ष, रोहित विठ्ठल पवार वय,१९ वर्ष (दोघे रा. दादा पाटील नगर तांदुळवाडी, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांच्या तपास पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र, म्हणाले तसे धागेदोरे हाती लागली नाहीत.