२ लाखांवर रोख व्यवहार, आयकर ला फोन जाणार दस्तनोंदणीपूर्वी उपनिबंधक कळविणार माहिती........
जळगाव : रोखीने होणाऱ्या दोनलाखांवरच्या प्रत्येक व्यवहारांची माहिती 'आयकर' विभागाला कळविणे आता उपनिबंधकांना संबंधित बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. चोरून व्यवहार करणाऱ्यांकडून आता 'आयकर' विभाग हिशेब मागणार आहे. त्यामुळे अनेकांना आता दंडात्मक कारवाईला सामारे जावे लागणार आहे.नियमित आयकर भरणाऱ्यांच्या व्यवहारांची माहिती सहज उपलब्ध होते. मात्र, अनेकजण 'आयकर' प्रणालीशी संलग्न झालेले नाहीत. म्हणून अनेकजण - त्यांच्या नावावर व्यवहार करण्याची वाट शोधतात. त्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या व्यवहारांची आयकर विभागाला माहिती होत नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यात दोन लाखांवरचा रोखीने व्यवहार होत असल्यास त्याची माहिती आयकर विभागाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.सर्वोच्च न्यायालय म्हणते...दस्तनोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रात कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी रोख रकमेद्वारे दोन लाख किंवा त्याहून अधिक रक्कम देण्याचा दावा केला जातो, तेव्हा संबंधित अधिकार क्षेत्रातील उपनिबंधक आयकर प्राधिकरणाला कळवतील. नोंदणी प्रक्रियेपूर्वी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे. तसे न केल्यास संबंधित अधिकाऱ्या विरुद्ध योग्य शिस्तभंगाच्या कारवाई मुख्य सचिवांना माहिती कळवतील, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या व्यवहारांसंदर्भात उपनिबंधकांसह पक्षकारांनी आयकर विभागाला माहिती कळविण्यासंदर्भात आवाहन करणारे फलक प्रत्येक कार्यालयाच्या प्रदर्शनी भागात लावण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत.सुनील पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव.