वर्धा :भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजनसरा येथे सद्गुरू संत भोजाजी महाराज श्री क्षेत्र आजनसरा येथे महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन 18 एप्रिल ला करण्यात आले. यावेळी18एप्रिल पासून ते 25 एप्रिल पर्यंत शिवमहापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथी महोत्सवाच्या सुरुवातीला रामाजी बापूराव परबत यांच्या हस्ते कलशस्थापना व विणा सुरू करून दैनंदिन कार्यक्रमाला सुरुवात झाली. सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे पाच पासून सहा वाजेपर्यंत काकडा आरती पासून सुरु होईल.