logo

महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमीत्त महिलांची भव्य स्कुटर रॅली काढण्यात आली.

काटोल:- महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमीत्त महिलांची भव्य स्कुटर रॅली काढण्यात आली. "ऑलराउंडर "महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली व माजी सभापती डिगांबरजी डोंगरे याचे मार्गदर्शनाखाली हि रॅली सुशोभित असे सुभ्रवस्त्र परिधान व डोक्यावर निळे फेटे बांधुन व हाती निळे झेंडे पकडुन जयभीम चे नारे सह स्कुटर महाजयभीम रॅली मधे सहभागी झाल्या. दरवर्षी प्रमाणे या वर्षी शुद्धा महा रॅली काढन्यात आली होती. हि रॅली आंबेडकर चौक पासून ते हत्तीखाना, जेतवन बुध्द विहार,प्रज्ञा बुद्ध विहार पेठ बुधवार, झेंडा समिती आयुडिपी ,यांनी या रॅली चे भव्य स्वागत केले, या महारॅलीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली, ठिक ठिकानी आईसक्रीम, शरबत, नास्ता व जेवनाची व्यवस्था करन्यात आली होती. या महा रॅली मध्ये गोंडी नृत्यांनी नागरिकांचे लक्ष्य वेधले.

या महाजयभीम रॅली मधे सहभागी झालेल्या महिला मीनाताई पाटील, कविता मडके, मंगला लोखंडे, ,विद्या तागडे, हर्षा नारनवरे, सुनिता रामटेके, रंजना ढोके, ज्योती ढोके, कांता वरघट, वनिता बागडे, अनिता नाईक ,सुनिता पाटील,जोशना नाईक, झामरे मॅडम, उज्वला ढोके, वर्षा सोमकुवर , जोशना तायवाडे, सुलोचना मानेराव, रमाबाई तायडे, अन्य महिला , व डिगांबरजी डोंगरे, विनायक ढोके , संभाजी सोनुले व मोठ्या संखेत नागरिक सहभागी झाले होते. व पंचशील बुध्द विहार काटोल येथे या रॅली चे स्वागत करन्यात आले.

29
1832 views