
बांबरुड राणिचे येथील जि.प.शाळेस "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक.......!
बांबरुड राणिचे येथील जि.प.शाळेचा "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा"स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक संपादित केला.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
महाराष्ट्र राज्य शासन द्वारा राबविण्यात येत असलेल्या "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा, बांबरूड राणीचे या शाळेने तालुकास्तरीय तृतीय क्रमांक पटकावून एक मानाचा टप्पा गाठला आहे. या गौरवपूर्ण यशामध्ये शाळेचे मा. मुख्याध्यापक भाऊ साहेब पवार यांच्या तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.यामुळे जि.प.शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तपशीलवार नियोजन, शिस्तबद्ध कार्यपद्धती, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेला स्वच्छता व सौंदर्यविषयक दृष्टीकोन आणि सर्वाच्या सहभागातून हे यश शक्य झाले आहे.
मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करत असून, भविष्यातही शाळेचे नाव उज्वल ठेवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन असेच प्रेरणादायी ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.असे शालेय शिक्षण समिती च्या अध्यक्ष व सदस्य यांनी विश्वास व्यक्त केला.
शाळेला प्राप्त झालेली ₹1,00,000/- बक्षीस रक्कम व प्रशस्ती पत्र ही त्यांच्या परिश्रमांची पावती असून, हे यश सर्व शाळेसाठी प्रेरणादायी ठरेल.
मा.मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांना व पालकांना शालेय शिक्षण समिति कडून मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.
यावेळी शालेय शिक्षण समिति अध्यक्ष रामकृष्ण पाटील व उपाध्यक्ष अशोक काळे, सदस्य किरण अशोक सुर्यवंशी,मनोज वाघ,माधवराव सोनवणे,दिपक पवार,गुलाब तडवी,व
जि.प.शाळा बांबरुड रणिचे मुख्याध्यापक तथा सचिव
श्री भाऊसाहेब दशरथ पवार सर,
श्री सुभाष मोतीराम जगताप,
श्री प्रशांत पांडुरंग गवळी,
श्री सचिन कुमार सोनवणे,
श्रीमती रुपाली,
श्रीमती गायत्री जैन,
श्री किशोर महाजन,
श्री भटुकांत,
श्री ज्ञानेश्वर मनोज चौधरी ,
श्री प्रविण सोनकुळ,
श्री राकेश धायबर,
श्री महेश गंवादे,
शिक्षक श्री अनिल रामसिंग बेलदार आणि इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.