logo

आदिवासींना शिक्षणासोबत एकीची आवश्यकता - संजय डांगोरे

काटोल:- आदिवासी कुंवारा भीमसेन जयंती उत्सव समिती द्वारा आयोजित करन्यात आला. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत कुवारा भीमसेन यांच्या जयंती उत्सव प्रसंगी संजय डांगोरे यांनी आदिवासी बंधूंना मार्गदर्शन केले . त्यामध्ये त्यांनी आदिवासींनी एकी आणि शिक्षणावर भर देण्यासाठी त्यांनी आग्रह धरला.
कुवारा भीमसेनचे मुख्य स्थान जरी भीमगड तालुका पारशिवनी जरी असले तरी काटोल तालुक्यातील फेटरी जुनवाणी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मानेमेट परिसरात जयंती उत्सव अनेक वर्षापासून साजरा करण्यात येतो. दिनांक १६ एप्रिल २०२५ ला मोठा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. परिसरातील शेकडो आदिवासी बंधू या कार्यक्रमाला उपस्थित होते .कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून काटोल पंचायत समितीचे माजी सभापती संजयजी डांगोरे उपस्थित होते .

यावेळी फेटरी जुवानीचे सरपंच सविता राजेंद्र बागडे ,उपसरपंच रवींद्र उईके, आदिवासी सेवा सोसायटीचे निळकंठराव गजभिये ,तांदूळवाणि सरपंच पुष्पा येडमे, खानगाव सरपंच कोमल परतेती, सामाजिक कार्यकर्ते पंकज शेंडे ,बेबीताई कवरती, शिशुपाल लोणारे ,पुरुषोत्तम गजभिये , मनीषा धुर्वे ,गणेश युवनाते , सुरेश खंडाते, दीपक सलामे ,सिताराम कवरोति ,अनिल परतेती ,निकेश परतेती, नितेश कुंभरे ,सामाजीक कार्यकर्ते रनजीत उमप यावेळी उपस्थित होते .

प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते रमेश धुर्वे यांनी केले तर संचालन मारुती सरयाम आणि आभार प्रदर्शन नत्थु युवनाते यांनी केले .
यावेळी परिसरामध्ये मानेमेट फेटरी येथील कुवारा भीमसेन देवस्थान परिसरात श्रीमती येनुबाई उईके यांनी अर्धा येकर शेती दान दिली .आणि तेथील परिसराचा विकास करण्यासाठी एक सामाजिक भवन, बोरवेल विद्युत पुरवठा ,मुख्यमार्गाला जाण्यासाठी एक रस्ता ,पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी संस्थेचे प्रमुख ज्ञानेश्वर तोडसाम यांनी संजय डांगोरे यांचेकडे लाऊन धरली. या वेळी परिसरातील शेकडो भाविक भक्ता करिता महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

9
93 views