logo

पुणे; युवा अल्पसंख्याक संसद येत्या शनिवारी होणार पुण्यात ...

प्रती,
पत्रकार परिशद, निमंत्रण
मा. संपादक / चीफ रिपोर्टर / ब्यूरो चीफ
प्रिंट मीडीया और इलेक्ट्रिानिक मिडीया

विशय: युवा अल्पसंख्याक संसद येत्या शनिवारी पुण्यात होणारबाबत.
‘‘अजित पवार यांच्या हस्ते युवा अल्पसंख्यांक संसदेचे शनिवारी पुण्यात उद्घाटन’’

महोदय,
अल्पसंख्यांक समाजातील युवकांना राजकारण, समाजकारणासह, साहित्य, कला व उद्योग क्षेत्रात मार्गदर्शक ठरणारी व युवकांना एकत्र आणणारे अल्पसंख्यांक युवा संसद यावर्षी पुण्यात होणार असून त्याचे उद्घाटन ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार’’ यांच्या हस्ते पार पडणार आहे . या अल्पसंख्यांक संसदेस देशभरातील विविध पक्ष संघटनेचे नेते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ही अल्पसंख्यांक युवा संसद शनिवारी 19 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील ‘‘गणेश कला क्रीडामंच’’ येथे सकाळी दहा वाजता सुरू होईल. या संसदेत बिहारचे खासदार पप्पू यादव, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, डॉ. हुलगेश चलवादी महासचिवः महाराष्ट्र राज्य बहुजन समाज पार्टी, अंबादास दानवे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानपरिषद, वजाहत मिर्जा पूर्व चेअरमेन वक्फ बोर्ड, मेहबूब शेख युवा प्रदेशाध्यक्षः राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, अॅड. मेहमूद पराचा वरिष्ठ अधिवक्ता सर्वाेच्च न्यायालय, फहद अहेमद युवा नेतेः राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार, हाजी जुबेर मेमन राष्ट्रीय कन्व्हेनर, अॅड. सुलतान फतेह अली खान, राष्ट्रीय कन्व्हेनर विद्यार्थी, छत्रपती शाहू महाराज खासदार महाराष्ट्र, मुहिबुल्लाह नदवी खासदार यूपी, कमाल फारुखी (AIMPLB), अमर साबळे माजी खासदार महाराष्ट्, हाजी अरफात शेख अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यक आयोग, रा. रेव्ह. डॉ. बिशप थॉमस डाबरे (ख्रिस्ती धर्मगुरू, समाज सुधारक), हाजी इब्राहीम भाईजान (मा.अध्यक्षः महाराष्ट्र राज्य हज समिती), अॅड. जेबा पठाण (सिनियर एडवोकेट उच्च न्यायालय अहमदाबाद), रमिंदर राजपा सिख गुरुद्वारा मेंबर पुणे, मा.सौ. सुप्रियाताई सुळे (खासदार, महाराष्ट्र), आगा सैयद रुहुल्लाह मेहदी (खासदार, कश्मीर), मा.श्री. राजु शेट्टी (मा. खासदार, महाराष्ट्र), कुंवर दानिश आली (मा. खासदार, उत्तर प्रदेश), रईस शेख (आमदार, महाराष्ट्र), आयपीएस अब्दुर रहमान, मा. श्री. प्रवीण गायकवाड (प्रदेशाध्यक्षः संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र), मा.श्री. पिटर डिसुझा (ख्रिश्चन नेते), अॅड. अमीर शेख (पूर्व अध्यक्ष, महाराष्ट्र NSUI निर्वाचित प्रतिनिधी, AICC), मा.श्री. उमेश चव्हाण संस्थापकः रुग्ण हक्क परिषद, नौशीन पार्कर सह-संस्थापक और सीडस्टार सेंटर ऑफ एक्सीलेंस के सीईओ, मा. सत्यवान गायकवाड, मा.बलीग नोमानी (दिल्ली कन्व्हेनर), मा. हाजी फरीद खान महाराष्ट्र कन्व्हेनर हजर राहणार.
या अल्पसंख्यांक युवा संसदेचे आयोजन हाजी जुबेर मेमन, लुकास केदारी, सत्यवान गायकवाड, एडवोकेट सुल्तान शाह यांनी केले आहे। तसेच या संसदेस अल्पसंख्याक समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहिती साठी संपर्क करा - 9850008278

5
721 views