
पुणे: सराईत आरोपीकडुन यमाहा कंपनीची दुचाकी गाडी जप्त ; भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी...
दिनांक १६/०४/२०२५ रोजीचे सायंकाळी ०५.०० वा चे सुमारास कात्रज चौकातील उसाचा रस विक्रीच्या दुकानाचे रामोरील बाजुचे रोडगर फियांदी अभिजीत शिवाजी घोरपडे, वय २० वर्षे, धंदा शिक्षण, रा. उत्कर्ष सोसायटी, लेन नंचर ५, कात्रज तलावाजवळ, कात्रज, पुणे यांनी यमाहा कंपनीची आर. एक्स. १०० तिचा नंबर Wnh2460 ही लॉक करून पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयाने चोरी केली आहे म्हणून फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २१५/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३-२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. बरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पू. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी च अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाचतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चीधरी महेश बारवकर, सागर बोरगे हे वर नमूद गुन्हयातील अंज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे मिथुन सुगंध लोखंडे, वय २२ वर्षे, रा. सनं १०३५ विनायक हॉटेल मागे, महात्मा गांधी सोसायटी, सहकारनगर भाग ०१, सहकारनगर पोलीस स्टेशन बाजुला, पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेली यमाहा दुचाकी गाडी क्रमांक Wnh2460 ही जप्त करण्यात आली असुन आरोपीवर पुढील कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पूणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील स्तो भा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. राहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम ५. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर, मंगेश पचार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार यांच्या पथकाने केली आहे.