बीड शहरा मधील मल्टीपरपज ग्राऊंड येथे मुस्लिम समाजा तर्फ़े वक्फ़ बिल रद्द करणे बाबत जाहीर निषेध.
दिनांक: 16/04/2025बीडबीड शहरा मधील मल्टीपरपज ग्राऊंड येथे मुस्लिम समाजा तर्फ़े वक्फ़ बिल रद्द करणे बाबत जाहीर निषेध दर्शविण्यात आले. ज्या मध्ये बीड शहरातील सर्व समजातील बांधव दिसत आहे. ह्या हजारोंच्या संख्येने आलेले लोकांची एकच मागणी दिसत आहे की वक्फ़ बिल हा 100% शासनाने वापस घेतला पाहिजे. वक्फ़ बोर्डची मालमत्ता ही शासनाची अथवा कोण्त्या ही संसथे ची नाही. सदर वक्फ़ ची मालमत्ता ही वक्फ़ बोर्डला दान केलेली आहे. जी की निजाम कालीन असो किंवा सध्या कोणी ही दान केलेली असो. बीड शहरातील युवकांचे मानवी साखळी तयार करत जाहीर प्रदर्शना मुळे नागरीकांमध्ये सरकार विरुध्द नाराजगी दिसुन येत आहे.ॲड. शेख शाहजेब ए. एम.बीड ता. जि. बीड