महाराष्ट्रात पाणीटंचाईचं संकट; धरणांमध्ये केवळ 41% साठा शिल्लक
राज्यातील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, कारण महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेषतः पुण्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये केवळ 36.31 टक्के पाणीसाठा उरला आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी अजून खूप कालावधी बाकी आहे , अशा परिस्थितीमध्ये जलसाठ्यामधील पाणी कमी होणे , हि चिंताजनक बाब आहे. यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक ठरणार आहे.