logo

मुंबईला बॉम्बने उडवून देऊ; दाऊदच्या धमकीने खळबळ, पण समोर आलं वेगळंच सत्य

मुंबईत एक खळबळजनक प्रकार घडला आहे. मंगळवारी (15 एप्रिल ) पहाटेच्या 2:30 च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता . या फोनमध्ये एक व्यक्ती मी ‘डी कंपनी’ चा सदस्य म्हणजेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सदस्य बोलतोय अन मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याचा दावा केला. या प्रकारामुळे अख्या शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या धमकीच्या फोनमुळे सगळी पोलीस यंत्रणा कामास लागली अन या प्रकरणाची कसून चौकशी केली. तर हा फोन नेमका कोणी केला? मुंबईमध्ये खरंच बॉम्ब सापडले का ? याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.




मुंबईला बॉम्बने उडवून देऊ; दाऊदच्या धमकीने खळबळ, पण समोर आलं वेगळंच सत्य

धमकीच्या फोनचे गांभीर्य –
या धमकीच्या फोनचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोध पथकाला सतर्क केला अन विविध ठिकाणी तपास सुरू करण्यात आला. पण प्राथमिक तपासादरम्यान कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला नाही. या प्रकारानंतर पोलिसानी तांत्रिक पद्धतीने फोन ट्रेस केला आणि काही तासांतच फोन करणाऱ्या आरोपीला शोधून काढले.

फोन करणारा व्यक्ती कोण आहे –
हा धमकीचा फोन करणारा अन मी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सदस्य बोलतो आहे , तसेच मुंबईत बॉम्बस्फोट होणार आहे, असे सांगणाऱ्या आरोपीला बोरिवली परिसरातून पोलिसानी ताब्यात घेतले आहे. याच नाव सूरज जाधव असे असून तो बोरिवलीचा रहिवासी आहे. विशेष म्हणजे, या सुरजणे यापूर्वीसुद्धा असाच एक खोटा फोन करून बॉम्बस्फोटाची धमकी दिली होती. त्या प्रकरणीही त्याला अटक झाली होती.

15
874 views