logo

नागपूरच्या पॉश एरियात रेस्टॉरंट मालकाला गोळ्या घालून संपवलं, धरमपेठ हादरलं!

राज्याच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गोळीबारची घटना घडली आहे. नागपुरातील या गोळीबाराच्या घटनेत एकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील पॉश समजल्या जाणाऱ्या धरमपेठ परिसरात गोळी झाडून एकाची हत्या करण्यात आली आहे. शोशा लाउंज एंड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी (वय 28) यांच्यावर गोळी झाडून ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र गोळीबाराच्या या घटनेने शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.
अंबाझरी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल, आरोपी अद्याप फरार
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोकुळपेठ बाजार परिसरातील शोशा लाउंज एंड रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी (28 वर्ष) हे रात्री मित्रांसोबत बसले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चार आरोपी दोन मोटरसायकलवरून त्यांची जवळ आले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर उपचारासाठी अविनाश भुसारी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र ही हत्या नेमकी कुणी आणि कुठल्या कारणातून झाली हे अद्याप कळू शकलेलं नाहीयेत्यामुळे पोलीस तपासात पुढे नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जुन्या वैमन्यस्यातून गँगवॉरची घटना, पोलिसांचा प्राथमिक अंदाज
गँगवॉरच्या जुन्या वैमन्यस्यातून नागपूरमध्ये अविनाश भूसारी याचे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक अंदाज अंबाझरी पोलिसांनी व्यक्त केला आहे . रात्री 1 वाजताच्या दोन दुचाकीवरून चार आरोपी आले. त्यांनी मित्रांसोबत बसलेल्या अविनाशवर सहा राऊण्ड फायर केला व पसार झाले. आरोपींची ओळख पटली असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत यांनी सांगितले. मौज मजेसाठी सोनसाखळी आणि दुचाकी चोरी, चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद
मौज मजेसाठी सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी भांडाफोड केलाय. तसेच या टोळीकडून चारीचे सोन खरेदी करणाऱ्या सराफ व्यावसायिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून जवळपास आठ तोळे चारीचे सोनं हस्तगत केलंय. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या यानंतर गंगापूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत सोन साखळी चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केले आहे.
यामध्ये तीन अल्पवयीन मुलासंह तिघांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागडे मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी आणि मौजमजा करण्यासाठी चोरी करायचे दरम्यान पोलिसांनी या टोळी कडून ११ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये नाशिक शहरातील सात तर पुणे जिल्ह्यातील तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

5
716 views