नाशिकमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
प्रतिनिधी १४ एप्रिल (नाशिक):- आज नाशिकमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नाशिक मध्ये अनेक ठिकाणी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. जयंतीसाठी नाशिककरांनी मोठी जय्यत तयारी केली होती. गेल्या काही दिवसांपासून तयारी करत होते. जयंतीसाठी भव्य असे स्टेज उभा करून आकर्षक असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभा करण्यात आले होते. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक अशी सजावट करून विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यामुळे परिसरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. १४ एप्रिल सुरू होताच मध्यरात्रीपासूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नाशिककरांनी सुरुवात केली होती. पूर्ण दिवसभर नाशिककर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत होते. नाशिककरांनी सायंकाळी अभिवादन करण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यामध्ये पुरुषांबरोबरच महिलांचा आणि मुलींचा विशेष सहभाग बघायला मिळाला. सायंकाळी मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीमध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. डीजे, ढोल, ताशा यांच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली होती. गुलालाची उधळण करत, फटाके, तोफा उडवत आनंद साजरा करत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गीतांनी आणि नाशिककरांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. या मिरवणुकीमध्ये पुरुषांप्रमाणेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक चालू होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी आणि मिरवणुकीच्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित रहावी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कतेचा उपाय म्हणून नाशिक पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.