"सावित्री कलयुगातली" हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
प्रतिनिधी ९ एप्रिल (नाशिक):- महाराष्ट्र सरकार तसेच भारत सरकार महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करत आहेत. महिलांनी त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होण्यासाठी अनेक योजनांमध्ये सहभागी करून तसेच अनेक क्षेत्रांमध्ये त्यांना संधी देऊन सक्षम बनवत आहेत. त्याच अनुषंगाने दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा यांनी सावित्री कलयुगातली या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण चालू केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सावित्री कलयुगातली या चित्रपटाचे लेखक तसेच दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा असून प्रोडक्शन पोपट कांबळे यांनी केले आहे. या चित्रपटाचे डायलॉग सुजाता पवार यांचे असून संवाद राकेश शिर्के यांचे आहेत. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका अभिनेते पवन चौरे आणि अभिनेत्री महेक शेख यांनी साकारली आहे. यंग मदर हॉट मदरची भूमिका अभिनेत्री श्वेता भामरे यांनी केली आहे. विलेनची भूमिका अभिनेते नानासाहेब बच्छाव यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात २० मार्चपासून झाली असून ९ एप्रिल पर्यंत पूर्ण होईल. या चित्रपटाचे चित्रीकरण नाशिक मधील त्रंबकेश्वर, दिंडोरी, जुने जलालपूर, वैतरणा डॅम, औरंगाबाद रोड तसेच उरण, बदलापूर या ठिकाणी झाले आहे. नाशिक मध्ये जवळपास ९० टक्के चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट ६ जूनला महाराष्ट्रातील प्रत्येक चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा यांनी दिली.