नाशिकमध्ये श्री राम नवमी मोठ्या भक्ती भावाने साजरी
प्रतिनिधी ६ एप्रिल (नाशिक):- नाशिकमधील दत्तनगर या ठिकाणी ओंकारेश्वर महादेव मित्र मंडळ यांच्या वतीने आज श्री राम नवमी मोठ्या भक्ती भावाने तसेच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री रामाच्या मूर्तीसाठी मोठे स्टेज उभा करण्यात आले होते. स्टेजवर श्री रामाची सुंदर अशी मूर्ती स्थापन केली होती. श्री रामाच्या दर्शनासाठी दत्तनगर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मंडळाच्या वतीने सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुंदी, खिचडी अशा खाद्यपदार्थांचा समावेश होता. सर्व नागरिक भक्ती भावाने प्रसाद घेत होते. मंडळाच्या वतीने सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार दत्तनगर परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. डीजेच्या तालावर श्री रामाच्या गाण्यांचा आनंद भाविक घेत होते. या मिरवणुकीमध्ये दत्तनगर परिसरातील अनेक भक्तांनी सहभाग घेतला होता. भक्तांनी दिलेल्या श्री रामाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला होता. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक चालू होती.