logo

ऑन द स्पॉट एफआयआर योजनेला होणार सुरुवात!जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरेंची संकल्पना.!


मन्सूर शहा बुलढाणा :-- जिल्ह्यातील पोलिस प्रशासनाने सामान्य नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाची योजना सुरु केली आहे. ऑन द स्पॉट एफआयआर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेची सविस्तर माहिती आज ५ एप्रिल रोजी बुलडाणा येथील एसपी कार्यालयाच्या हॉलमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुढे त्यांनी बोलतांना
सांगितले की, या योजनेंतर्गत, बुलढाणा जिल्ह्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोबाईल अथवा गोपनीय माहितीच्या माध्यमातून दखलपात्र गुन्हा घडल्याची माहिती मिळाली, तर त्वरित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि डीबी पथक घटनास्थळी दाखल होतील. त्यांच्या सोबत लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटरसह आवश्यक साधनांनी सज्ज असलेले शासकीय वाहन असेल. घटनास्थळी पोहोचल्यानंतर अधिकारी थेट संगणकावर तक्रार नोंदवून, तक्रारदाराच्या नोंदवलेल्या
ऑन द स्पॉट एफआयआर योजनेला होणार सुरुवात
* जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरेंची संकल्पना.
तक्रारीची प्रिंट काढून त्याबर त्याची सही घेतली जाईल. नंतर ही तक्रार स्कॅन करून संबंधित पोलीस ठाण्याच्या ई-मेलवर पाठवली जाईल, असे विश्व पानसरे यांनी सांगितले. या
योजनेच्या माध्यमातून पोलिसांकडून महिलांवर होणारे अत्याचार, बालकांवरील गंभीर गुन्हे, ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय यांसारख्या गंभीर गुन्हयांमध्ये तात्काळ कारवाई होणार आहे. यामुळे घटनास्थळीच
एफआयआरची नोंद होऊन तपासाला वेग येणार असून पुढील कार्यवाही शक्य होणार असल्याचे विश्व पानसरे म्हणाले. घटनास्थळीच तपास व तक्रार नोंदविण्याची ही योजना पोलिस
सेवेत पारदर्शकता आणून सामान्य माणसाचे जीवन अधिक सुखकर करेल, असा विश्वास जिल्हा पोलिस अधिक्षक विश्व पानसरे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली आहे.

11
955 views