logo

डी पी आय च्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा...

सांगली प्रतिनिधी -

आज डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सामाजिक न्याय विभागाचा कोठ्यावधीचा निधी लाडकी बहीण योजनेकडे वर्ग करून मागासवर्गीय महामंडळ व मागासवर्गीय समाजावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालय सांगली समोर निदर्शने करण्यात आली तसेच तासगांव तालुक्यातील पूर्व भागामध्ये सावळज हे मोठी बाजारपेठ तसेच मोठ्या रहादरीचे व शेतीवर अवलंबून असणारे गाव असून सावळज पंचक्रोशी मध्ये वाहन अपघात तसेच विजेचा धक्का व सर्पदंश च्या घटना घडत असून जखमीस तातडीचे उपचार व अत्यावश्यक रुग्णवाहीका वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांना आपले जीव गमावावे लागत आहेत तरी सावळज गावी कायमस्वरूपी १०८ रुग्णावाहीका मिळावी यासाठी सांगली सिव्हिल सर्जन श्री. विक्रमसिंह कदम साहेब यांना निवेदन देण्यात आले.यावेळेस,नंदकुमार जी नांगरे साहेब (डी.पी.आय राजउपाध्यक्ष), सतीशजी लोंढे साहेब(प. महाराष्ट्र अध्यक्ष),अशोकजी वायदंडे साहेब(डी.पी.आय.जमीन झोपडी अभियान महाराष्ट्र अध्यक्ष),अमितकांबळे(डी. पी. आय.युवकध्यक्ष प.महाराष्ट्र), प्रशांत भाऊ आवळे (डी. पी आय सांगली जिल्हाध्यक्ष), दादासो कस्तुरे (डी. पी. आय.सांगली शहर अध्यक्ष) उपस्थित होते*

126
7131 views