logo

नाशिक विभागीय महसूल आयुक्ततांना महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे कडुन इनाम 6 ब महार वतन जमीनींची बोगस खरेदी विक्री बाबत निवेदन

नासिक महाराष्ट्र ए आय एम मेडीया नाशिक भिमटोला सामाजिक संस्थेने नाशिक विभागीय महसूल आयुक्ततांना नाशिक शहरातील गट नंबर 80/3 तसेच गट नंबर 867/1अ ही शेतजमीन मुकुंद काळे मधुकर काळे व इतर लोकांची वडीलोपार्जित मिळकती असुन सदरच्या मिळकती या इनाम 6 ब महार वतन जमिनी असुन या शासनाच्या परवानगी शिवाय खरेदी विक्री व हस्तांतरित केली जात नसतांना देखील काही धनदांडगे भुमाफीयांनी अशा जमिनीच्या मालकांना साम,दाम,दंड भेद ह्या नितीचा वापरून हया जमिनी स्वतःच्या घशात घातलेल्या असुन मुळ मालकांना भुमी हीन केलेले असुन यात शासनाची सुद्धा मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे अशा भुमाफीयांवर शासनाने कठोर स्वरूपातील कारवाईचा बडगा उचलुन यांच्या वर फौजदारी व दिवाणी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी चे निवेदन नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांना भिमटोला सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिल गांगुर्डे यांनी दिले असुन यावर लवकरच शासन दखल घेऊन कारवाई करतील असे आश्वासन महसुल आयुक्त यांनी दिले. यावेळी निवेदन देतांना प्रदेश अध्यक्ष विकीभाऊ भोळे मंगला काळे पिप्लस रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा नेते यशवंत टिल्लूभाई साळवे नाशिक जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर भिमयोद्धा प्रतिक सोनटक्के मुकुंद काळे मधुकर काळे ताराचंद्र काळे युवा नेते प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

23
2320 views