logo

लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथे वाघाच्या हल्ल्यात डाकराम देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी झालो.

लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट येथे वाघाच्या हल्ल्यात डाकराम देशमुख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी झालो.

गेल्या ४ महिन्यांपासून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने आपण आवाज उठवला, मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे आवश्यक ती पावले उचलली गेली नाहीत, आणि त्याचा परिणाम म्हणून आज एक निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने प्रभावी उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. या संदर्भात राज्याचे वनमंत्री मा. श्री. गणेशजी नाईक तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तत्काळ ठोस पावले उचलण्याची मागणी केली. प्रशासनाने झोपेतून जागे होऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा परिस्थिती अधिकच बिघडू शकते. स्थानिक नागरिकांचे संरक्षण आणि वाघाच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचलली गेली पाहिजेत.

41
1943 views