logo

गुढीपाडवा निमित्त भुसणी येथे भव्य कुस्ती मैदान – वीर योद्धा संघटनेतर्फे विजेत्याला 5000/-रोख बक्षीस

गुढीपाडवा निमित्त भुसणी येथे भव्य कुस्ती मैदान – वीर योद्धा संघटनेतर्फे विजेत्याला 5000/-रोख बक्षीस

गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर औसा तालुक्यातील भुसणी येथे भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी वीर योद्धा संघटनेतर्फे ₹5001 ची कुस्ती लावण्यात आली.

या थरारक कुस्ती स्पर्धेत 20 मिनिटे रंगलेल्या चुरशीच्या लढतीनंतर निर्णायक जोड विजयी ठरली. लातूर ग्रामीणच्या मातीतून तयार झालेल्या पैलवानांनी दमदार खेळ दाखवत कुस्तीप्रेमींचे लक्ष वेधले. विजयी मल्लांचे विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी, वीर योद्धा संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख श्री निळकंठ किल्लारीकर, मराठवाडा प्रमुख श्री संतोष यादव, श्री शंकर भैया रांजणकर पांडुरंग क्षिरसागर, तसेच आयोजक, वस्ताद आणि ग्रमिन पोलीस ठाण्याचे मा. पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व कुस्तीप्रेमींचे मोलाचे योगदान लाभले. यामुळे लातूरच्या मातीत कुस्ती संस्कृती अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

🚩 पैलवानांचे हार्दिक अभिनंदन! 🚩
🚩 कुस्ती संस्कृती जपण्यासाठी अशीच एकजूट ठेवूया! 🚩

0
397 views