logo

अमावस्या निमित्त श्री संत बाळूमामा मंदिरात भाविकांची गर्दी

सातारा जिल्हा माण प्रतिनिधी विठ्ठल खांडेकर
श्री संत बाळूमामा यांचा जन्म महाराष्ट्रात एका सामान्य कुटुंबात झाला. ते नेहमी ध्यानात मग्न असत आणि त्यांना भविष्य पाहण्याची आणि लोकांना मदत करण्याची अलौकिक शक्ती असल्याचं मानलं जातं. श्री संत बाळूमामा वर लोकांची खूप श्रद्धा आहे आणि या श्रद्धेपोटी प्रत्येक महिन्याच्या अमावस्या निमित्त लोक आदमापूर व इतर ठिकाणी असलेल्या श्री संत बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात त्याचप्रमाणे माण तालुक्यांमध्ये पर्यंती गावात असलेल्या बाळूमामा मंदिरात आज लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. प्रथम सकाळी आरती होऊन दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला आणि हा महाप्रसाद सर्व भाविक भक्तांना घेतला.

26
1998 views