logo

पुणे - तुमचे सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्वप्नं आहे का? आणि हे स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी तुम्ही ‘सीए’च्या परीक्षेची

आईमा मीडिया दिनांक :29/03/2025
CA Final Exam : सीए अंतिम परीक्षा आता वर्षातून होणार तीनदा!
तुमचे सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्वप्नं आहे का? व हे स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी तुम्ही ‘सीए’च्या परीक्षेची तयारी करत आहात का? अहो, मग इकडे लक्ष
पुणे - तुमचे सनदी लेखापाल (सीए) होण्याचे स्वप्नं आहे का? आणि हे स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी तुम्ही ‘सीए’च्या परीक्षेची तयारी करत आहात का? अहो, मग इकडे लक्ष द्या! आता तुम्हाला सनदी लेखापाल होण्यासाठीच्या परीक्षांच्या शेवटच्या टप्प्यातील सीए अंतिम (फायनल) परीक्षा वर्षातून तब्बल ‘तीनदा’ देता येणार आहे. त्यामुळे सीए होण्याचे स्वप्नं साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार आहेत.
होय, हे अगदी खरे आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) संस्थेच्या २६व्या परिषदेत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जात होती. गेल्यावर्षी ‘आयसीएआय’ने इंटरमिजिएट आणि फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या परीक्षा वर्षातून तीन वेळा घेण्याचा निर्णय घेतला होता, आणि आता सीए फायनलची परीक्षा देखील तीनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, आता सीए फायनल, इंटरमिजिएट आणि फाउंडेशन या तिन्ही स्तरांवर विद्यार्थ्यांना समान संधी मिळणार आहे. या परीक्षा जानेवारी, मे आणि सप्टेंबर महिन्यात आयोजित केल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार आहेत.
याशिवाय, ‘इन्फॉर्मेशन सिस्टिम्स ऑडिट’ मधील पोस्ट-क्वालिफिकेशन अभ्यासक्रमातही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी ही परीक्षा वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जात होती. मात्र, ही परीक्षाही वर्षातून तीन वेळा घेतली जाणार असून फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर या महिन्यांत ही परीक्षा होणार आहे.
या निर्णयाबाबत ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए चरणजोत सिंग नंदा म्हणाले, ‘हा ऐतिहासिक निर्णय विद्यार्थ्यांसाठी आणि सदस्यांसाठी फायदेशीर आहे. भविष्यातील चार्टर्ड अकाउंटंट्सना अधिक संधी मिळाव्यात, म्हणून हा संस्था सातत्याने कार्यरत आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळू शकणार आहेत.’

0
12 views