logo

आईमा मीडिया पुणे : दिनांक 29/03/2025 सोने दरात 700, तर चांदी दरात 1100 रुपयांची वाढ कोल्हापूर : सोन्याच्या दरात सातत्

आईमा मीडिया पुणे :
दिनांक 29/03/2025
सोने दरात 700, तर चांदी दरात 1100 रुपयांची वाढ
कोल्हापूर : सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, शुक्रवारी (दि. 30 मार्च) कोल्हापूर सराफ बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 700 रुपयांनी वाढून 91,600 रुपयांवर पोहोचला. चांदीचा दरही 1,100 रुपयांनी वाढून 1,03,800 रुपये प्रति किलो झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे ही दरवाढ झाली आहे.

गाझा संघर्षामुळे भूराजकीय तणाव वाढल्याने आणि अमेरिकेतील संभाव्य मंदीच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करत आहेत. दर वाढले असले, तरी गुढीपाडवा हा सोने खरेदीचा शुभ मुहूर्त मानला जातो. भविष्यात दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज असल्याने ग्राहकांकडून सराफांकडे मोठ्या प्रमाणावर दागिन्यांच्या ऑर्डर्स नोंदवण्यात आल्या आहेत. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय 88,930 रुपये आहे, तर चांदीचा दर जीएसटीशिवाय 1,002,00 रुपये आहे.

4
79 views