
आईमा मीडिया पुणे दिनांक :29/03/2025
Gudi Padwa 2025 : यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त नेमका कधी आहे ? गुढी उभारण्याची न
आईमा मीडिया पुणे दिनांक :29/03/2025
Gudi Padwa 2025 : यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त नेमका कधी आहे ? गुढी उभारण्याची नेमकी वेळ, तिथी आणि जाणून घ्या पाडव्याचे महत्व...!
Gudi Padwa 2025 Shubh Muhurt : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्व आहे. चैत्र महिना म्हणजेच गुढी पाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. घराघरात पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी पहायला मिळते. पाडवा म्हंटलं की आधी डोक्यात येतो तो मुहूर्त. दारात गुढी मुहूर्तावरच उभारायची असा सर्वांचा आग्रह असतो. त्यामुळे यंदाचा पाडव्याचा मुहूर्त काय आहे. तिथी कोणती आहे तसेच पाडवा आपल्याकडे कसा साजरा करतात हे पाहुयात.काठीवर अडकवलेला तांब्या,आंब्याच्या डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी, झेंडूच्या फुलांचे तोरण, दारातील रांगोळ्या, घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पाडवा साजरा केला जातो. गुढी उभारताना पहिला प्रश्न असतो पाडव्याचा मुहूर्त काय आहे ? त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर काळजी करू नका आज आपण यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आणि तिथी बद्दल जाणून घेणार आहोत.हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 मिनिटांनी सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता संपेल. त्यामुळे सनातन धर्मानुसार उदय तिथीला महत्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.गुडीपाडवा मुहूर्त
सूर्योदय - सकाळी 06:13
सूर्यास्त - संध्याकाळी 06:38
चंद्रोदय- सकाळी 06:34
चंद्रास्त - संध्याकाळी 07:50