logo

चोरीच्या ४ दुचाकींसह चोरटा जाळ्यात.....


जळगाव : चोरीच्या दुचाकी घेऊन
फिरणाऱ्या विक्रम भिका चव्हाण (२७, रा. वसंतवाडी, ता. जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले. त्याच्याकडून वेगवेगळ्या भागातून चोरी झालेल्या चार दुचाकी हस्तगत केल्या.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, हरिलाल पाटील, प्रवीण भालेराव यांनी विक्रम चव्हाण याला त्याच्या घरून ताब्यात घेतले.

19
487 views