logo

महिला सरपंचाला शिविगाळ करणाऱ्या ग्रा.पं.सदस्याविरूध्द गुन्हा दाखल! चिखली तालुक्यातील अमडापुर येथील घटना..


मन्सूर शहा .धोत्रा. भ .बुलडाणा चिखली :----तालुक्यातील अमडापूर येथील ग्रामपंचायत सरपंच वैशाली संजय गवई यांना जातीयवाचक शिविगाळ व विनयभंग करणारा जातीयवादी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद अण्णासाहेब देशमुख विरूध्द अमडापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रा.पं.सरपंच यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, 2021 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मी आणि माझे पती, संजय सुखदेव गवई आम्ही दोघेही ग्राम पचायत सदस्य म्हणून अनुसूचित जातीच्या राखीव कोट्यातून निवडुन आलो आहे. सरपंचपद हे अनुसूचित जाती महिलासाठी राखीव असल्यामुळे सरपचपदी नेमणूक करण्यात आली. प्रसाद अण्णासाहेब देशमुख हे सुध्दा आमच्या सोबतच ग्राम पंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
ग्राम पंचायत कार्यालयात 22 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता मासिक सभेचे आयोजन केले होते. यावेळी ग्रामसचिव आणि ग्राम पंचायत सदस्य हजर होते. सभा चालु असताना प्रसाद देशमुख याने विविध मागणीचा अर्ज केला होता. त्यावर चर्चा करण्यात आली तेंव्हा त्याने हेतूपूरस्सरपणे वाद घालत लज्जा वाटेल असे विचीत्र हातवारे करीत होता. सभेच्या शेवटी ग्राम सेवक यांना मालमत्ता क्रं. 604 संदर्भात तक्रार अर्ज असल्याने तसेच ते प्रकरण न्यायालयात प्रकरण चालु असल्याने ग्राम सेवकास निर्देश दिले कि, मालमत्त क्र. 604 च्या नोंदी बाबत न्यायालयीन आदेशानुसार ग्राम पंचायत निर्णय घेईल, असा ठराव घेण्यात अशा सूचना दिल्या, त्यावेळेस प्रसाद देशमुख याने मुद्दामपणे माझ्या जवळ येऊण माझ्या हातातील कामकाज रजीष्टर हिसकावुन घेतले व जातीवाचक शिविगाळ करून विनयभंग केला. या तक्रारीवरून आरोपी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद देशमुख विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

17
582 views