
शिरसोली गावचे सुपुत्र यांचे यवतमाळ जिल्हा पोलीस दला श्री. कुमार चिंता (भा.पो.से.) पोलिस अधीक्षक यवतमाळ कडून सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन खंडाळा चे श्री. देविदास पाटील प्रशस्तीपत्र
दारव्हा शहरातील अनोळखी आरोपींनी एका महिला फिर्यादीचे घरात प्रवेश करून डोक्याला चाकू व बंदूक लावून कपाटातील सोन्या-चांदीचे च रोख रक्कम असा एकूण २२ लाख ४६ हजार रु.चा मुद्देमाल चोरून नेला असता तात्काळ दारव्हा पोलीसांनी नियंत्रण कक्ष व वरिष्ठांना माहिती देऊन जिल्ह्यात नाकाबंदी करून पो.स्टे. दारव्हा येथे अप. क्र. २८४/२०२५ कलम ३१० (२), ३१० (६) भान्यासं सहकलम ३/२५, ४/२५ आर्म्स अॅक्ट अन्वये दाखल करण्यात आला व नाकाबंदी दरम्यान यातील अनोळखी सहा आरोपींना वाहनासह पकडून त्यांच्याकडून एकूण ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये २ देश कट्टे, २ जिवंत काडतुस हत्यारासह हस्तगत केला आहे. आपण केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद व प्रशंसनीय आहे.
आपली कर्तव्य परायणता व चिकाटी नक्कीच स्तुत्य आहे. आपली कामगिरी ही यवतमाळ जिल्हा पोलीस विभागाकरिता अतिशय अभिमानास्पद बाब आहे. याबद्दल आपणास शुभेच्छांसह हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे.