कारवाई केलेले वाळूचे वाहन घेऊन चालक क्षणात पसार...
जळगाव : तालुक्यातील नागझिरीशिवारातील गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करणारे वाहन पकडले, मात्र ते जिल्हाधिकारी कार्यालयात आणत असताना चालक ते वाहन घेऊन पसार झाला. ही घटना २४ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारासघडली. याप्रकरणी चालक दिलीप पाटील (रा. शिरसोली, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागझिरी शिवारातील गिरणा नदीपात्रातून विना क्रमांकाच्या वाहनातून वाळूची वाहतूक सुरू असताना झुलेलाल वॉटर पार्कजवळ महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली.कारवाई करण्यात आलेले वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात आणत असताना चालक ते वाहन घेऊन पसार झाला.या प्रकरणी २५ मार्च रोजी ग्राममहसूल अधिकारी अजय धनराज बिडवे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.फिर्यादीनुसार, वाहनचालक दिलीप पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार अधिकार पाटील करीत आहेत.