महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दसरा मेळाव्याच्या बॅनरवर पहिल्यांदाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 30 तारखेला रविवारी गुढीपाडवा मेळावा शिवाजी पार्क दादर येथे होणार आहे. मनसे पदाधिकारी मुनाफ ठाकूर यांनी शिवाजी पार्क परिसरात गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आपले फोटो वापरू नये, असं सांगितलं होतं. मनसेच्या सुरुवातीच्या काळात मनसेच्या पोस्टरवर बाळासाहेबांचे फोटो पाहायला मिळत होते मात्र बाळासाहेबांच्या सूचनेनंतर आतापर्यंत कोणीही बाळासाहेबांचे फोटो मनसेच्या बॅनरवर लावले नव्हते. पण आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरल्याचा प्रकार समोर आला आहे.
मात्र या बॅनरबाजीवरून उद्धव ठाकरेंनी' आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही' असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला आहे.