
रमजान ईद निमित्त आझाद युवा फाउंडेशनच्यावतीनेआवश्यक वस्तूंचे किट वाटप.
प्रतिनिधी (शरीफ काझी) - रमजानच्या पवित्र महिना चालू असून रमजान ईद चार पाच दिवसावर असतानाच सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुस्लिम समाजातील गोरगरीबांना रमजान सणाला आवश्यक लागणार्या वस्तुंचे किट वाटप करण्यात आले.
आझाद युवा फाउंडेशन वतीने सामाजिक कार्य म्हणून दिवाळी सणा निमित्ताने गोरगरीब हिंदू बांधवांना ही दिवाळी सणाला लागणार्या वस्तुंचे वाटप वाटप करण्यात येते तसेच आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने कायम हिंदू -मुस्लिम सलोख्याचे संबंध राखण्यासाठी प्रयत्नशील असते.
यावेळी बोलताना आझाद युवा फाउंडेशन चे अध्यक्ष अजीज शेख म्हणाले आम्ही सालाबाद प्रमाणे रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजातील गरजवंत लोकांना ईद ला लागणारे सर्व वस्तूंचे किट दिले असुन यापुढे ही आमची आझाद युवा फाउंडेशन ची टीम सर्व समाज बांधवांना सहकार्य करत रहाणार आहे व ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण देणे आहे असेच समजतो तेच या माध्यमातून छोटीशी मदत म्हणून करत आहोत यावेळी आम्हाला उद्योजक अय्युबभाई पटेल व जावेद शेख यांचेही विशेष सहकार्य लाभले त्यांचे आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने विशेष धन्यवाद असे सांगितले.
यावेळी आझाद युवा फाउंडेशन चे उपाध्यक्ष समीर जहागिरदार, सचिव इम्तियाज सय्यद, खजिनदार आसिफ शेख, सर्वेसर्वा डॉ शहाजहान काझी, उद्योजक अय्युबभाई पटेल, जावेद शेख,अमिर काझी,रब्बेसलाम शेख,अस्लम शेख, फारुख देशमुख, इम्रान बागवान आदी उपस्थित होते.