
प्राध्यापकांच्या संदर्भातील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवू- विभागीय सहसंचालक डॉ.किरणकुमार बोंदर
नांदेड, दि. २७ : नांदेड विभागीय सहसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या संदर्भातील सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ . किरणकुमार बोंदर यांनी दिली.
दि.२६ मार्च रोजी आयोजित विविध प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी विभागीय सहसंचालक डॉ. किरण कुमार बोंदर यांनी संवाद बैठकीदरम्यान विविध विषयावर चर्चा संपन्न झाली.
या संवाद बैठकीत प्राध्यापकांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली
मागील काही दिवसापूर्वी वृतपत्रात उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयाबद्दल बातम्या प्रसारित झाल्या त्याबाबत संघटना सहमत नसल्याची भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडून स्पष्ट केले. उच्च शिक्षण विभागाच्या परिक्षेत्रातील महाविद्यालयातील प्रश्न वेळेत कसे सोडवता येतील याबाबत चर्चा झाली. शिवाय जीपीएफ व एम.फिल बाबतचे प्रश्न, सीएचबी प्राध्यापकांचे प्रश्न ,कार्यालयाच्या नावे कुणी आर्थिक देवाणघेवाणीची मागणी करत असेल तर त्याबाबत कार्यवाही केली जाईल. उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालय प्रलंबित प्रश्न आणि वेतना संदर्भातील संचिका मार्गी लावणार आहे. या बैठकीदरम्यान प्राध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयावर चर्चा केली. सहसंचालक कार्यालयाने आज पर्यंत प्राध्यापक संघटनेच्या मागण्या सोडवल्या आहेत त्याबद्दल संघटना प्रतिनिधीने सहसंचालक कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले.
दर तीन महिन्याला सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संवाद बैठक आयोजित करण्याचे या संवाद बैठकीत ठरले. प्राध्यापकाची थकबाकी देयके निकाली काढल्याबद्दल, आणि सीएचबी प्राध्यापकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावून मानधन वेळेत दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
विभागीय सहसंचालक कार्यालय येत्या काळात सौर ऊर्जेचा वापर करणार असून संपूर्ण परिसर स्वच्छ आणि सुंदर व हरित करून पर्यावरण संवर्धनाचे कार्य हाती घेतल्याबद्दल सहसंचालक कार्यालयाचे सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदनही करण्यात आले. या बैठकीत सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बैठकीदरम्यान प्रसार माध्यमात
हेतूपुरस्कर काही संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडून विभागीय सहसंचालक कार्यालयाविरोधात चुकीची माहिती पसरवली जात असल्याच्या वृत्ताला संघटनांनी विरोध दर्शवित विभागीय सहसंचालक कार्यालय आणि प्राध्यापक संघटना यामध्ये विसंवाद निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध या बैठकीदरम्यान नोंदविण्यात आला. या प्रसंगी विभागीय सहसंचालक डॉ . किरण कुमार
बोंदर म्हणाले की, वैयक्तिक हितासाठी नियमाला बाजूला ठेवून कोणी कार्यालयात मागणी करत दबाव निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे .
सहसंचालक कार्यालय कायदा व नियमांचे पालन करून च काम करीत असते. कायदा व नियमांचे उल्लंघन करून कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही सर्व अन्यायाच्या विरोधात आपणास जाब विचारू असे स्पष्ट मत देखील संघटनेने व्यक्त केले. अनेक प्रश्न चर्चा करत सोडवता येतात या सहसंचालक कार्यालयाने घेतलेल्या भूमिकेला सर्वांनी समर्थन दिले. यावर सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी स्पष्ट केले की, कार्यालय आपल्या कार्यपद्धतीत ई-प्रशासन प्रक्रियेचा अवलंब करत पारदर्शकता ठेवून कार्यरत आहे. शासनाच्या नियमावलीच्या अधीन राहूनच प्रश्न सोडवले जातील. वेळोवेळी शासनाने दिलेले आदेश, शासन निर्णय, कायदा व नियम विचारात घेऊन अंमलबजावणी केली जाते. शासन निर्णय, कायदा व नियमाला बाजूला ठेवून निर्णय दिले जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयाच्या बाहेर कार्यालयाचे नाव पुढे करून कोणी कामाबाबत पैशाची मागणी करत चुकीचे काम करत असेल तर कार्यालय त्याचे समर्थन करत नाही. आपण देखील त्याला बळी पडू नये.कार्यालय कामात गतिमानता अचूकता व पारदर्शकपणा येण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्राची चेकलिस्ट व कार्य पूर्ण होण्याचा लागणारा कालावधी याची माहिती देऊन काम केले जाईल. जेणेकरून कारण नसताना कोणाच्या कामाला विलंब होणार नाही. विनाकारण कार्यालयात येण्याची आपणास गरज पडणार नाही . आपल्या सर्वांच्या हितासाठी भविष्यात नागरी सनद कार्यालयात कशी लागू होईल यासाठी देखील प्रयत्न केला जाईल. सीएचबी प्राध्यापकांचे मानधन दरमहा पूर्ण वेळ प्राध्यापकांचे वेतन वेळेत देण्याचे आश्वासन सहसंचालक कार्यालयाने दिले. तसेच पूर्ण वेळ प्राध्यापक नसलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होणार नाही याकरता शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच सीएचबी प्राध्यापकांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबबाबत नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे सहसंचालक म्हणाले.
कार्यालयातील सर्व कामे वेळेत पार पडण्यासाठी नागरिक सनद तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे.
प्राध्यापक संघटनांशी नियमित संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून प्राध्यापकांच्या समस्या आणि प्रश्न वेळेत सोडवता येतील.अशी चर्चा बैठकी दरम्यान झाली
या बैठकीस अभाराशैम चे प्राचार्य डॉ. दीपक बच्चेवार,डॉ. सुहास पाठक स्वामुक्टा प्राचार्य डॉ. जोगदंड एस. एम., डॉ. डी.एन. मोरे, डॉ. विजय भोपाळे, डॉ. रामचंद्र भिसे, प्रा. डॉ. दिलीप पाइकराव स्वा. मुप्टा विभागीय अध्यक्ष डॉ. शेखर घुंगरवार ,सचिव डॉ. रामदिनेवार गोविंद, राष्ट्रीय शिक्षक महासंघ चे प्रा.सदाशिव भुयारे, माबटा चे डॉ. व्ही. सी. बेलुरे, मुक्ला चे
डॉ. अनिल जाधव, डॉ. रामदिनेवार गोविंद, डॉ. सुहास पाठक, नेशनल असोसिएशन ऑफ रिसर्च इन हायर एज्युकेशन चे प्रा. राजपालसिंह चिखलीकर ,डॉ. शिवराज मंगनाळे, नेट- सेट पीएच.डी. धारक संघर्ष समितीचे डॉ. परमेश्वर पोळ प्रा. प्रबुद्ध रमेश चित्ते आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.