logo

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर


नांदेड, २५- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आली आहे.
यापूर्वी दि. ४ मार्च २०२५ रोजी अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळांवर प्रकाशित करण्यात आली होती. या उत्तरसूचीवर विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषयतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सुधारणा करण्यात आल्या आहेत.

चौकट
अंतिम उत्तरसूची ही अंतिमच राहणार

शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी स्पष्ट केले आहे की, अंतिम उत्तरसूची ही अंतिम समजली जाणार असून, या संदर्भात कोणत्याही प्रकारची निवेदने किंवा पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारेच निकाल तयार केला जाईल. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिक माहितीसाठी https://puppssmsce.in व https://www.mscepune.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.

0
0 views