logo

यवतमाळ नगर परिषद प्रशासनाच्या मनमानीविरोधात काँग्रेससह विरोधकांचे धरणे आंदोलन – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर



यवतमाळ,26 मार्च: नगर परिषद प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच नागरी सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आज नगर परिषदेसमोर आज दिनांक 26 मार्च (बुधवार) रोजी धडक धरणे आंदोलन करण्यात आले.
शहर काँग्रेस कमिटी व यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनीही सक्रिय सहभाग घेतला.आंदोलकांनी नगर परिषद मुख्याधिकारी शुभम कॅतमवार यांच्या बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
महाविकास आघाडीने मुख्याधिकाऱ्यांविरोधात लोकप्रतिनिधींना डावलून भाजपच्या माजी आमदारांकडून भूमिपूजन व उद्घाटन घडवणे, विकास निधीचा अपव्यय व पक्षपाती वाटप,तसेच नगर परिषदेत सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
धरणे आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.यात मुख्याधिकाऱ्यांची चौकशी,निधीचे न्याय्य वाटप,लेखा विभागाच्या गैरव्यवहारांची थर्ड पार्टी चौकशी आणि भविष्यात भूमिपूजन व उद्घाटन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीतच होईल,याची हमी देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके,माजी आमदार कीर्ती बाबू गांधी,राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर इंगळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद वाढोणकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश भिसणकर,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख,यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांच्यासह विक्की राऊत, संतोष बोरले,संजय रंगे,अतुल गुल्हाने,चेतन शिरसाट,ज्ञानेश्वर गायकवाड,छोटू पावडे,राजू पोटे, पल्लवी रामटेके,प्रवीण देशमुख, राजू गावंडे,छोटू सवाई,सोशल मीडिया काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके,राहुल भानावत सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ,हाविकास आघाडीतील कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच यवतमाळ शहरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर पुढील दिशा
महाविकास आघाडीने प्रशासनाविरोधात लढा तीव्र करण्याचा इशारा दिला असून,जर मागण्या पूर्ण न झाल्या,तर आणखी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यामुळे प्रशासनाची भूमिका काय असेल आणि यावर काय उपाययोजना केल्या जातील,याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोट---
"नगर परिषद प्रशासनाचा मनमानी व पक्षपाती कारभार हा लोकशाहीसाठी घातक आहे. विकासकामांचे भूमिपूजन आणि निधी वाटपात अन्याय होत आहे. जर प्रशासनाने त्वरित सुधारणा केल्या नाहीत, तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू."
-- प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख ( शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष, यवतमाळ )

2
109 views