
चव्हाणवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी निवड सौ स्मिता मनोज नांगरे पाटील त्यांची बिनविरोध निवड
*चव्हाणवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदी स्मिता मनोज नांगरे पाटील यांची बिनविरोध निवड*. चव्हाणवाडी ग्रामपंचायत सरपंच पद रिक्त झाल्याने आज दिनांक 21 मार्च 2025 रोजी सरपंच पदाचे निवडणूक पार पडली या निवडणुकीत स्मिता मनोज कुमार नांगरे पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड संपन्न झाली. त्यासाठी सूचक म्हणून ज्योती सुभाष इंदलकर होत्या.या निवडी प्रसंगी पाच सदस्य उपस्थित होते तर दोन सदस्य गैरहजर होते. निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे गावामध्ये बोलले जात होते परंतु हनुमंत अण्णा चव्हाण यांच्या भूमिकेने सामना एकतर्फी झाल्याचे चित्र दिसले. निवड होताच फटाके व गुलालाची उधळण करण्यात आली. या निवडी प्रसंगी माजी सरपंच नवनाथ शिंदे, माजी उपसरपंच हनुमंत अण्णा चव्हाण, श्री. मोहन चव्हाण श्री भागवत तात्या खडके सुभाष काका चव्हाण हनुमंत दादा जाधव बापूराव, सुभाष बापू इंदलकर, मिस्कीन सतीश मिस्किन, तानाजी चव्हाण, बाळासाहेब मोठे सुनील नांगरे विजय आबा कदम भीमराव नांगरे अनिल नांगरे बाळासाहेब नांगरे, पोलीस पाटील हनुमंत इंदलकर, जमाल काझी, अनिल जगताप, महावीर आबा नांगरे अनिल चव्हाण विलास नाना नांगरे अनिलदादा नांगरे रमेश आप्पा नांगरे, कल्याण नांगरे अमोल भाऊ नांगरे सागर चव्हाण पृथ्वीराज चव्हाण राजकुमार नागणे राजकुमार अमोल नागणे खंडू नागणे ज्योतीराम पवार ज्योतीराम शिंदे, औदुंबर खडके, रोहन काका चव्हाण नितीन आबा चव्हाण, तसेच चव्हाणवाडीतील नांगरे परिवारा वरती प्रेम करणारे हितचिंतक उपस्थित होते.