logo

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकसह चार वाहने जप्त


इच्छादेवी चौकासह कडगावमध्ये कारवाई



जळगाव : बांभोरीवरून वाळूची उचल करून भुसावळकडे जाणाऱ्या ट्रकसह तालुक्यातील कडगाव येथे ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भुसावळला जाणारा ट्रक सकाळी जात असताना पकडण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री गस्ती पथकाने दोन डंपर जप्त केले. तहसीलदार शीतल राजपूत, मंडळाधिकारी राजेश भंगाळे, आशिष पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी महामार्गासह गिरणा नदी पात्रात गस्त सुरू केली आहे.

बांभोरीहून वाळूची उचल करून निघालेला ट्रक शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास खोटेनगर, शिवकॉलनी, आकाशवाणी चौकातून इच्छादेवीकडे जात असताना पथकाने रोखले. ट्रकमध्ये अडीच ब्रास वाळूचा साठा दिसून आला. त्यानंतर लगेचच ट्रक जप्त करण्यात आला.

पोलिसांचे काय ?

बांभोरीवरून सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वाळू घेऊन निघालेला हा ट्रक तीन मुख्य चौकातून गेल्यानंतरही पोलिसांना दिसून आला नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अर्धा ब्रास वाळू भरून निघालेले ट्रॅक्टर देखील ताब्यात घेण्यात आले. तर रात्री २ डंपर पकडले. शुक्रवारच्या या दोन्ही कारवायांनी वाळूमाफिया आता रात्रीचा दिवस करताना दिसत आहेत

17
1003 views