नेहरु युवा केंद्र नागपूर व जिवनकरिता सोशल फाऊंडेशन काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने इ-जनरेशन येथे जागतिक टी.बी.दिनानिमित्त जनजागृती...!
काटोल प्रतिनिधी - इ-जनरेशन भवन येथे जागतिक टी.बी.दिनाच्या निमित्ताने नेहरु युवा केंद्र नागपूर व जिवनकरिता सोशल फाउंडेशन काटोल यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रम पार पडला.त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मा.श्री.पवन इरखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना टी.बी.या रोगा विषय माहिती व मार्गदर्शन दिले.तसेच इ-जनरेशन चे संचालक मा.श्री.योगेश जी भोसे सर यांनी टी.बी.या रोगाबद्दल सामाजिक जागरूकता करुन योग्य उपचार घेऊन त्याला हद्दपार करता येते,असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाला उपस्थित सोलर ट्रेनर मा.अश्विनी दुधाणे मॅडम ,जिवनकरिता सोशल फाउंडेशन चे संचालक-युवनेश जी चाफले सर,प्रकल्प व्यवस्थापक-विकास सोमकुवर व सोलर कोर्स चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी टी.बी.जनजागृती कार्यक्रमाला उपस्थित होते.