logo

वनविभागाने जागतिक दिनानिमित्त निसर्ग संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . . . .

ठाणे जिल्ह्यातील / ता कल्याण
आज गुरुवार , २० मार्च २०२५ रोजी सकाळी ०७ ते . १० : ३० वा पर्यंत
जागतिक स्तरावर पर्यावरण पुरक दिवस साजरे केले जातात .

उद्देश एकच निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे
👉 २० मार्च जागतिक चिमणी आणि बेडूक दिवस साजरा करण्यात येतो .
👉 २१ मार्च जागतिक वनदिवस .
👉 २२ मार्च जागतिक जल दिवस .
👉 २३ मार्च जागतिक हवामान दिवस .

थोडक्यात हे सर्व दिवस साजरे करण्याचा हेतू एकच निसर्गातील प्रत्येक घटकाचे
( संरक्षण ) आणि संवर्धन करणे आवश्यक आहे .

२० मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून ओळखला जातो . ठाणे जिल्हा अंतर्गत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी ( प्रादेशिक ) भिवंडी च्या पुढाकाराने गणेशपुरी व जवळील भागात असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दुर्बिणीच्या सहाय्याने पक्षी - निरीक्षण चे आयोजन करण्यात आले.

या पक्षी निरीक्षणात चिमणी , कोकिळ ,
मैना , बगळा , घार , घुबड व अन्य पक्षी आढळले . आजच्या चिमणी दिन निमित्त भारतात व अन्य देशांत आढळणाऱ्या चिमण्यांची ओळख त्यांचे निसर्गातील महत्व , टॉवर चे रेडिएशन , सिमेंट काँक्रिट चे जंगल व अन्य पर्यावरणीय कारणांमुळे पक्ष्यांवर होणारे दुष्परिणाम इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधला तसेच बेचकी द्वारे चिमणी व अन्य पक्ष्यांची शिकार करू नये त्यांच्यासाठी दाणा - पाणी ठेवून निसर्गातील घटकाच्या संवर्धनासाठी हातभार लावणे इत्यादी विषयांवर चर्चा करून वनविभागातर्फे मार्गदर्शन करण्यात आले .

38
2118 views