
बांबरुड राणिचे येथे कृषी विभागामार्फत प्रशिक्षण कार्यशाळा.....!
बांबरुड राणिचे येथे कृषी विभागामार्फत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
महाराष्ट्र राज्य कृषी विभागातील विविध योजनांची गाव निहाय आणि मंडळ प्रमाणे तालुक्याचा कृती आराखडा तयार करण्याची विशेष मोहीम दिनांक 20/03/25 ते 25/03/25 पर्यंत राबवण्यात येत आहे
पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणीचे
ग्रामपंचायत कार्यालय येथे सायंकाळी 6 वाजता हा मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यक्रम असंख्य गरजू शेतकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत पाटील कृषी सहाय्यक यांनी केले.या कार्यक्रमात. मा. मंडळ कृषी अधिकारी श्री. यु.आर. जाधव साहेब यांनी पुढील काही महत्वाच्या योजनाबद्दल मार्गदर्शन केले.
1)पी एम किसान- या योजनेची अंतर्गत ई केवायसी
2) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ....फळ झाडे आणि शेवगा लागवड तंत्रज्ञान
3) सूक्ष्म सिंचन योजना- अर्ज प्रक्रिया, योजनेचे फायदे, अनुदान, तांत्रिक मार्गदर्शन
4) PMFME - अर्जप्रक्रिया ते प्रकरणास बँक मंजुरी मिळणे बाबत
5) जलयुक्त शिवार अभियान 2.0 - मृदसंधारणा विषयी जनजागृती
6) बियाणे व खत पुरवठा- सन 2025-26 मधील खरीप हंगामातील पीक नियोजन व पूर्वतयारी
7) ॲग्रीस्टॅक- आणि किसानं कार्ड
8) मागेल त्याला शेततळे- योजना
9) महाडीबीटीवरील सर्व योजना संदर्भात अर्ज प्रक्रिया कागदपत्रे आणि आणि योजनांचे महत्त्व
10) महाडीबीटीवरील कृषी यांत्रिकीकरणा ची व्याप्ती
11) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमाचे महत्व
11) डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान नियोजन
12) मृदा तपासणी विषयी जनजागृती
13) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
14) आत्मा योजनेअंतर्गत विविध घटक
15) प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उदोग योजना (PMFME)
श्री. जाधव साहेब यांनी गावातील लोंकाचा सहभाग पाहुन आपले गाव आदर्श गाव बनु शकते अशी अपेक्षा व्यक्त केली
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी
श्री. साळवे, श्री अभिजित पाटील
संगीता मॅडम व पवार मॅडम, रोहिणी पाटील, रविंद्र पाटील कृषी सहाय्यक यांनी परिश्रम घेतले होते
सर्वांचे श्री. अभिजीत पाटील कृषी सहाय्यक आभार माणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली