
यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक, बहुउद्देशीय सामाजिक संस्था" अहिल्यानगर यांच्या वतीने प्रमोद डफळ यांना राज्यस्तरीय "आदर्श पत्रकारीता" पुरस्काराने सन्मानित
राहुरी प्रतिनिधी : दि. २४ मार्च २०२५, यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने प्रमोद डफळ यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार २०२५ या पुरस्काराने रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय स्वास्तिक चौक टिळक रोड अहिल्यानगर येथे गौरव चिन्ह, सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने नातेवाईक तसेच मित्रपरिवार यांच्याकडून त्यांच्यावर सत्काराचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आजतागायत ते मराठी माणसाच्या बुलंद आवाजासाठीच लढत असुन पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारिता क्षेत्राची व्याख्या बदलून टाकली आहे. त्यांच्या पत्रकारितेची दखल घेत "यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक, बहुउद्देशीय सामाजिक संस्था" अहिल्यानगर यांच्या वतीने त्यांचा ‘आदर्श पत्रकारिता’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. कांतीलाल जाडकर यांनी आदर्श पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दलचे निवडपत्र दि. १७ मार्च रोजी पाठवून कळवले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की आपण गेली कित्येक वर्ष समाज निर्मितीसाठी घट्ट पावले होऊन एक चांगले पुण्याचे काम करीत आहात, तसेच संविधानातील मूल्यांची जोपासना जनमानसात विविध उपक्रम व कार्यांद्वारे यशस्वी करीत आहात. प्राप्त परिस्थितीचे योग्य आकलन करून तात्कालीन समस्यांना भिडून आपल्या परीने या प्रक्रियेला जास्तीत जास्त गतिमान करून आपले विचार पुढे नेणारे आहेत. तुमच्या कार्याला सलाम करण्यासाठी आम्ही यशवंत सेना व जय मल्हार शैक्षणिक, बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अहिल्यानगर यांच्या वतीने आपल्याला राज्यस्तरीय "आदर्श पत्रकारिता" हा पुरस्कार जाहीर केला असुन सदर पुरस्कार रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्वास्तिक चौक, अहिल्यानगर येथे सकाळी ११ वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते आपल्याला बहाल करण्यात येणार असल्याचे आयोजक तथा संस्थेचे अध्यक्ष श्री. कांतीलाल जाडकर यांनी कळवले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत सेनेचे श्री विजयभाऊ तमनर हे होते. विजयभाऊ तमनर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले की कोणत्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारची अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्या मदतीसाठी कधीही तयार आहोत.
कार्यक्रमासाठी ओमकार महाराज वैद्य युवा कीर्तनकार, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष विजय भाऊ तमनर, यशवंत सेना शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, अशोक सूर्यवंशी मुख्याध्यापक मिरजगाव, एकनाथ आव्हाड पोलीस उपनिरीक्षक अहिल्यानगर, शब्बीर पठाण जेष्ठ नागरिक संघटना, श्री गवते सर, डॉ. शिंदे मिरजगाव, डॉ. नितीन खरात, मुंबई, प्राध्यापक यादव सर आदी मान्यवर उपस्थित होते.