logo

बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारतीय बौद्ध महासभा, संविधान मैत्री संघ, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट युथ व शहरातील तमाम बौद्ध विहारांच्या माध्यमातून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकार्याला निवेदन दिले.

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी महारॅली
गोंदिया: बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, भारतीय बौद्ध महासभा, संविधान मैत्री संघ, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट युथ व शहरातील तमाम बौद्ध विहारांच्या माध्यमातून महाबोधी महाविहार मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यांमध्ये शहरात फुलचूर पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महारॅली काढण्यात आली.
महारॅलीचे रूपांतर सभेत झाले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. सभेत अनेक मान्यवरांची भाषणे झालीत. सर्वांनी महाबोधी महाविहार मुक्त झाला पाहिजे, महाबोधी टेम्पल ॲक्ट 1949 रद्द झाला पाहिजे, जनगणना तसेच ओबीसीची जाती आधारित जनगणना झाली पाहिजे, महापुरुषांचा अपमान थांबला पाहिजे व ईव्हीएम हटवून मताधिकार हा मतपत्रिकेने झाला पाहिजे असे विचार व्यक्त करण्यात आले. त्यात गौरव कोल्हटकर, अंकला बोंबार्डे, यशवंत रामटेके, वसंत गवळी, ममता बोरकर, धनीराम बरीयेकर, स्वप्नील महाजन, भाग्यवान फुल्लुके, सूर्यभान बागडे, उत्क्रांत उके, संतीता जांभुळकर, हंसकला गणवीर, अतूल सतदेवे, केशवराव देशमुख यांची भाषणे झाली व अध्यक्षता डॉ. विनोद गेडाम यांनी केले. या महारॅलीमध्ये गोंदियाच्या आजूबाजूच्या गावातील अनेक महिला व पुरुषांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुजाता बागडे, सविता भालेराव, चंद्रमा फुलझले, अरुणा चव्हाण, पौर्णिमा जनबंधू, वंदना उके, शालिनी मेश्राम, मधुकर मेश्राम, करुणा तिरपुडे, वर्षा शेंडे, राजू कामत, परमानंद मेश्राम, वनमाला साखरे, माया हिरकने, हिरकणा नांदगाये, चंद्रशेखर चौधरी, सिद्धार्थ फुले, डॉ.अनंत शिरसाठ, प्रवीण रंगारी, सुधीर रंगारी यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुणा कामत व विक्की लिल्हारे यांनी केले तर आभार शालिनी बोरकर यांनी केले. सरतेशेवटी चौथ्या टप्प्याच्या 9 एप्रिलच्या जेलभरो आंदोलनासाठी सर्वांना सहभागी होण्यास विनंती करण्यात आले.

9
3409 views