logo

शिरूर ताजबंद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बुद्धभूषण मोरे तर उपाध्यक्षपदी विकी सरवदे तर सचिव पदी राजेश सरवदे.

शिरूर ताजबंद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी बुद्धभूषण मोरे तर सचिव पदी राजेश सरवदे.
धर्मपाल सरवदे, शिरूर ताजबंद प्रतिनिधी :- अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती उत्सव समितीची बैठक काल दि. २२ रोजी रात्री ८: ३० वाजता मार्गदर्शक माधव सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली भीम नगर येथिल स्वप्नस्फूर्ती निवास येथे घेऊन जयंती उत्सव समितीची कार्यकारणी गठित करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी बुद्धभूषण मोरे, उपाध्यक्षपदी विकी सरवदे तर सचिव पदी राजेश सरवदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे सहसचिव शिवाजी बनसोडे, कोषाध्यक्ष संमेक सरवदे, संघटक अविनाश कांबळे, आनंद सरवदे, मिरवणूक प्रमुख नितीन कांबळे, रतन वाहुळे, गजानन गायकवाड, स्वप्नील सरवदे, आदेश डबडे, राज सरवदे, दीप सरवदे तर जेष्ठ सल्लागार मारोती सरवदे, भगवानदादा कांबळे, शिवाजी सरवदे, कमलाकर सरवदे, नागनाथ बनसोडे, राहूल सरवदे, तुकाराम कांबळे, प्रकाश सरवदे, बालाजी कांबळे तर प्रसिद्धीप्रमुख जेष्ठ पत्रकार बाबुराव श्रीमंगले, राजकुमार सोमवंशी, मलिकार्जुन स्वामी, बालाजी पडोळे, दिलीप मोरे, शिवाजी श्रीमंगले, धर्मपाल सरवदे तसेच स्वागतध्यक्ष म्हणून माधव सरवदे, बळीराम मोरे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी बौद्ध उपासक, उपासिका, बालक, बालिका यांच्या सह रमामात महिलामंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

29
490 views