logo

बांबरुड राणिचे येथील शेतकर्याच्या पशुधनावर बिबट्याचा हल्ला.....!

बांबरुड राणिचे येथील शेतकर्याच्या पशुधनावर बिबट्याचा हल्ला केला.
पाचोरा प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष (Aima Media):-
पाचोरा तालुक्यातील बांबरुड राणिचे येथील शेतकरी अशोक ओंकार डांबरे यांच्या शेततील गोऱ्हावर बिबट्याने हल्ला केल्याने गोऱ्हा मरण पावला.
बांबरूड राणिचे येथील शेतकरी अशोक ओंकार डांबरे यांच्या खड़की शिवारातील तेली बडल्ली जवळील गट नंबर ५१ मध्ये २ बैल,३ गाई, ५ वासरे व ३ गोऱ्हा शेतात होते,त्यामधील ३ वर्षाचा गोऱ्हा बिबट्याने दि,१९ मार्च रोजी रात्री ८.३० सुमारास हल्ला केला,दि,२१ मार्च रोजी वन्य विभाग अधिकारी यांना घटनेची माहीती दिली अस्ता वन्य विभागाचे कर्मचारी व शिपाई यांनी येऊन पचंनामा केला व पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर यांनी पी.एम रिपोर्ट दिला.अशोक डांबरे यांचे पशुधनाची हानी झाली असुन शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी करते आहे.

0
0 views