logo

चिमुकल्यानी पुर्ण केला आपल्या जिवनातील रमजानचा पहीला रोजा•••••••

चिमुकल्यानी पुर्ण केला
आपल्या जिवनातील रमजानचा पहीला रोजा•••••••
Aima media network (रियाझ शाह)JAFRABAD
सध्या मुस्लीम बांधवाचा पवीत्र रमजान महीना सुरु असून आज रमजान महीन्याचा २० वा • रोजा संपन्न झाला, रमजान महीना लागला कि मुस्लीम समाजा मध्ये मोठ्या उत्साहात लहान-मोठे आणी वयोवृद्ध रोजे. ठेवतात. आणी प्रत्येक घरात महीनाभर मोठ्या प्रमाणात रोजेदार असतात. ते बघुन लहान-लहान मुलांना सुद्धा रोजे ठेवण्याचा उत्साह संचारतो. आणी ते रोजे ठेवण्याचा अट्टाहास करतात.

धर्माच्या पाच अरकांना पैकी. रोजा एक आहे, रोजा ठेवल्यावर दिवसभर अललाची इबादत करने व नमाज पठण करणे हे कार्य केले जातात. लहान मुलांनी रोजा ठेवला कि त्यांना त्याचे पालक कपडे घेतात फुलांचा हार घालतात मीठाई देतात, तसेच नातलगांकडून भेट वस्तु देण्यात येतो.

कुंभारझ्ररी येथील रहीवासी अन्सार शहा याचा मुलगा हुंजेफा शहा मुलगी सायमा सहेर यांनी आपल्या जिवनातील पवित्र रमजानचा पहीला रोजा पूर्ण केला. पहीला रोजा पूर्ण केल्या बद्दल त्याचे आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू भाऊ-बहीण नातलगांनी अभीनदन केले.

53
6322 views