लाइट ची समस्या
आमगांव तालुक्यात वीजपुरवठा खंडित; नागरिकांनी घ्यावी पूर्वतयारीआमगांव : तालुक्यातील 33/11kV मरविम आमगांव वितरण उपकेंद्र अंतर्गत 132kV पारेषण / ट्रांसमिशन सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे परिस्थितीनुसार वीजपुरवठ्याच्या वेळेत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. या समस्येच्या निराकरणासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे कार्य हाती घेण्यात आले असून, त्यासाठी कमी जास्त पुढील 10 दिवस दररोज 6 तास वीजपुरवठा बंद राहणार आहे.विद्युत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, फीडरनुसार वीजपुरवठा खंडित होण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल:⚡ आमगांव फीडरसकाळी: 4:00 ते 6:00सकाळी: 8:00 ते 10:00संध्याकाळी: 4:00 ते 6:00⚡ अंजोरा फीडररात्री: 2:00 ते 4:00सकाळी: 10:00 ते दुपारी 2:00संध्याकाळी: 6:00 ते 8:00रात्री: 10:00 ते 12:00⚡ सालेकसा फीडर रात्री: 2:00 ते 4:00सकाळी: 6:00 ते 8:00सकाळी: 10:00 ते 12:00संध्याकाळी: 6:00 ते 8:00रात्री: 10:00 ते 12:00⚡ इर्री फीडर मध्यरात्री: 12:00 ते 2:00सकाळी: 6:00 ते 10:00दुपारी: 2:00 ते 6:00⚡ इंडस्ट्रियल फीडर रात्री: 8:00 ते 12:00⚡ तिगाव फीडर रात्री: 2:00 ते 4:00सकाळी: 6:00 ते 8:00सकाळी: 10:00 ते 12:00संध्याकाळी: 6:00 ते 8:00रात्री: 10:00 ते 12:00⚡ दहेगाव फीडर मध्यरात्री: 12:00 ते 2:00सकाळी: 8:00 ते 10:00दुपारी: 12:00 ते 2:00दुपारी: 04:00 ते 6:00विद्युत विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, ते आपल्या आवश्यक कामांचे नियोजन या वेळेनुसार करून सहकार्य करावे. तसेच, अनियमिततेमुळे निर्माण होणाऱ्या असुविधेबद्दल विभागाने खेद व्यक्त केला आहे.