
सातारा : बदनामी केल्याच्या संशयावरून एकाचा दोघांनी केला खून, एक जण ताब्यात
फलटण : आदर्की खुर्द ता. फलटण गावचे हद्दीत आदर्की बुद्रुक ते आदर्की खुर्द जाणारे रस्त्यावर आपली बदनामी केल्याचा संशय घेऊन त्याचा राग मनात धरून दुचाकीला चारचाकी गाडीने धडक देवून खाली पडल्यावर कोयत्याने वार करून रत्नशिव संभाजी निंबाळकर (रा. आदर्की खुर्द) यांचा खून केल्या प्रकरणी दोघांविरुध्द लोणंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे .
याबाबत लोणंद पोलिसांनी सांगितले की दि. 12 /03/ 2025 रोजी सकाळी 10.15 वाजता सुमारास आदर्की खुर्द ता. फलटण गावचे हद्दीत आदर्की बुद्रुक ते आदर्की खुर्द जाणाऱ्या रोडवर राजेंद्र जाधव यांचे बांधकाम चालू असले घराचे समोर दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर (रा. आदर्की खुर्द ता. फलटण) यांच्या प्रेम संबंधाबाबत गावात रत्नशिव निंबाळकर यांनी बदनामी केली आहे असा संशय घेऊन त्याचा राग मनात धरून विनोद राक्षे (रा. आदर्की खुर्द) याच्याशी संगणमत करून रत्नशिव संभाजी निंबाळकर यांचा खून करण्याचे उद्देशाने प्रथम त्यांचे एक्टिवा गाडी (क्रमांक MH -47-V-0549) याला मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका कार (MH -26-BX-6546) ने पाठीमागून जोराचे धडक देऊन रत्नशिव निंबाळकर यांना खाली पाडले .खाली पडल्यावर त्यास विनोद महादेव राक्षे याने धरून दत्तात्रेय उर्फ काका निंबाळकर याने कोयत्याने हातावर डोक्यात वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला आहे. याबाबात
कमलेश संभाजी निंबाळकर यांनी दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर, विनोद महादेव राक्षे (दोघे रा. आदर्की खुर्द) यांच्याविरुद्ध लोणंद पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी विनोद महादेव राक्षे याला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयापुढे उभे केले असता दि. 25 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पुढील तपास सपोनी सुशील भोसले करीत आहेत.