logo

विहीघर ग्रामस्थ मंडळ चषकाचा मानकरी आई गावदेवी इलेव्हंन संघ कळवा

विहीघर ग्रामस्थ मंडळ चषकाचा मानकरी आई गावदेवी इलेव्हंन संघ कळवा

उपविजेते त्रिक्षा दक्ष क्रिकेट संघ हरिग्राम; तर मालिकावीर चिखले संघाचा प्रशांत पाटिलचा गौरव

साई स्टार क्रिकेट संघ विहीघर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विलास नारायण फडके आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक २०२५ चे आयोजन विहीघर येथील साई स्टार क्रिकेट मैदानात दिनांक १५ मार्च ते १९ मार्च २०२५ रोजी पार पडले. या स्पर्धेचे उदघाट्न शेकापचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.सदर ५ दिवसीय क्रिकेट स्पर्धामध्ये एकूण ४८ संघांनी सहभाग नोंदवून खेळाचे उत्तम सादरीकरण केले. दिनांक १९ मार्च रोजी अंतिम दिवसाच्या सत्रात मातब्बर संघांनी आमनेसामने येऊन खेळाचे सादरीकरण केले. यावेळी हरिग्राम आणि कळवा पेण यांच्यात पार पडलेल्या अंतिम सामन्यात पेण येथील आई गावदेवी इलेव्हन संघ कळवा यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. तर त्रिक्षादक्ष क्रिकेट संघ हरिग्रामला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करणाऱ्या चिखले क्रिकेट संघाच्या प्रशांत पाटील या खेळाडूला मालिकावीर म्हणून लायन ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बाळुशेठ फडके पुरस्कृत दुचाकी देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर उत्तम खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना सायकल भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या स्पर्धेला आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांनी भेट देत स्पर्धेचे कौतुक केले. स्पर्धेदरम्यान लायन ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बाळुशेठ फडके तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माथाडी सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रभुदास उर्फ आण्णा भोईर यांच्या रॉयल एंट्रीने साऱ्यांचे लक्ष वेधले. यावेळी स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांचे, संघमालकांचे, स्पर्धा यशस्वी पार पाडणाऱ्या सर्वच व्यावसायिक प्रशिक्षकांचे तसेच विहीघर ग्रामस्थांचे आभार मानत अशाच दर्जेदार स्पर्धा यापुढेही अंमलात आणल्या जाणार असल्याचे सांगितले.

0
0 views