
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उलवेमध्ये होणार उलवेरत्न पुरस्कार सोहळा
दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत उलवेमध्ये होणार उलवेरत्न पुरस्कार सोहळा
समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रत्नांचा होणार गौरव; आम्ही उलवेकर मित्र मंडळाचे आयोजन
पनवेल : राज भंडारी
आम्ही उलवेकर मित्र मंडळ उलवे यांच्यावतीने दिला जाणारा उलवेरत्न पुरस्कार शनिवारी दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उलवेतील सेक्टर १७ येथील मैदानावर पार पडणार आहे. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रत्नांचा गौरव या निमित्ताने केला जाणार असून आम्ही उलवेकर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या उलवेरत्न पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष मोठ्या दिमाखदार पद्धतीने पार पडणार आहे.
आम्ही उलवेकर मित्र मंडळाच्या वतीने समजपयोगी कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. यामध्ये उलवे परिसरातील नागरिकांच्या गैरसोयी दूर करणे, महिलांसाठी विविध उपक्रम राबविणे तसेच शिवजयंती, गुढीपाडवा, होळी आदि सण देखील याठिकाणी एकत्रितरित्या राबविण्याचे उपक्रम या मंडळाच्या वतीने केले जातात. याचाच एक भाग म्हणून गतवर्षी आम्ही उलवेकर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन राजे येरुणकर यांनी उलवेरत्न पुरस्कार देण्याची प्रथा सुरु केली. मागील वर्षी सुरु केलेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या रत्नांचा शोध घेऊन त्यांना गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून यावर्षीचा हा पुरस्कार सोहळा अधिक दर्जेदार पद्धतीने केला जाणार असल्याची माहिती यावेळी आम्ही उलवेकर मित्र मंडळाचे संस्थापक सचिन राजे येरुणकर यांनी यावेळी दिली.