
दंतवैद्य कैलास गवई यांनी केले मौलिक मार्गदर्शन
जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा
दंतवैद्य कैलास गवई यांनी केले मौलिक मार्गदर्शन
सत्य कुटे/चिखली :
असं म्हणतात की, प्रत्येक हास्यामागे सुंदर दात असतात ! म्हणूनच दातांचे आरोग्य आणि काळजी घ्या ! आपले हास्य टिकवून ठेवा ! मौखिक आरोग्य दिन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपजिल्हा रूग्णालय, चिखली येथे दि. 20 मार्च २०२५ रोजी साजरा करण्यात आला. यावर्षीची मौखिक आरोग्य दिनाच्यानिमित्त घोषणा वाक्य निर्माण केलेले आहे की, A Happy mouth is a Happy mind म्हणजे जर तोंडाचे आरोग्य चांगलं असेल तर तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहील.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना दंतवैद्य कैलास गवई म्हणाले की, २० मार्च हा मौखिक आरोग्य दिन म्हणून का साजरा केला जातो तर या दिनानिमित्त तोंडाचे आरोग्य कसे चांगले राहील व त्यानिमित्त आपले शारीरिक आरोग्य कसे उत्तम राहील याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो. आपल्याला माहित आहे की आपल्या तोंडाचे आरोग्य जर चांगले असेल तर आपल्याला होणारे कितीतरी आजार आपण आटोक्यात आणू शकतो जसे की आपल्याला होणारे हृदयाचे आजार आपण तोंडाचे आरोग्य चांगले ठेवले तर आटोक्यात आणू शकतो की ज्यासाठी स्ट्रिप्टोकोकस व्हेरीडान्स हा बॅक्टेरिया कारणीभूत आहे असे हृदयाचे आजार म्हणजेच बॅक्टेरियल इंडो कार्डायटिस आणि तो झाला तर त्याचे पुढील गुंतागुंतीचे आजार आपण नियंत्रित ठेवू शकतो म्हणून तोंडाची स्वच्छता जसे की, दोन वेळेस ब्रश करणे .काहीही खाल्ल्यानंतर चांगला चूळ भरणे कोणतेही व्यसन न करणे. नियमित दिवसभरात मध्ये मध्ये पाणी पिणे. तोंडामध्ये झालेला कुठलाही बदल दिसून आल्यास दंतशल्य चिकित्सकास भेट देऊन त्याचं वेळेत निदान करून घेणे जेणे करून गुंतागुंती व मोठ्या आजाराला बळी न पडणे. गुटखा सुपारी खाल्ल्यामुळे आपले तोंडातील त्वचा ही घट्ट होऊन कालांतराने तोंड कमी उघडणे तिखट न खाता येणे दातांची स्वच्छता करण्या स अडथळा निर्माण होणे व पुढे चालून तोंडात अल्सर तयार होऊन कॅन्सर मध्ये रूपांतर होणे असे दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे गुटका सुपारी खाणे टाळणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही आजारावर उपाय आहेत परंतु आजार होऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे व्यसन घातक आहेत ते माहीत असून सुद्धा करणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे आहे म्हणून सर्वांनी कोणत्याही व्यसनापासून दूर राहणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या दिनानिमित्त मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो उत्तम तोंडाचे आरोग्य हे उत्तम शारीरिक आरोग्याचे द्वार आहे हा गुणमंत्र सर्वांनी अंगीकारावा. असे केल्यास आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करू शकतो .
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने दंतवैद्य डॉ.कैलास गवई, डॉ.सय्यद उमर ,डॉ जोशी मॅडम ,
कॅम्बेल मॅडम , डॉ.फारूक , निखिल पाटील ,
गणेश देशमुख, अमोल डुकरे , उमेश पडघान,
अनिल देशमुख ,गायकवाड यांच्यासह बहुसंख्य रुग्ण उपस्थित होते.